महिलेला अश्लिल शिवीगाळ करत विनयभंग;

 धरणगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

धरणगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्युज प्रतिनिधी । तालुक्यातील रेल येथे राहणाऱ्या १९ वर्षीय महिलेला अश्लिल शिवीगाळ व मारहाण करत विनयभंग केल्याचे घटना शनिवार ७ ऑक्टोबर रोजी सकाळी ४ वाजता सुमारास घडली आहे. याप्रकरणी धरणगाव पोलीस ठाण्यात एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या संदर्भात महिलांनी दिलेली फिर्याद अशी की, धरणगाव तालुक्यातील रेल गावात १९ वर्षीय महिलाही आपल्या परिवारासह वास्तव्याला असून शेतीचे काम करून आपला उदरनिर्वाह करते. शनिवारी ७ ऑक्टोबर पहाटे ४ वाजेच्या सुमारास गावात राहणारा अशोक हिरामण भिल याने महिलेच्या घरात घुसून तिचे आई-बहीण व महिलेला अश्लील शिवीगाळ करत लाठ्याकाठ्यांनी मारहाण केली तसेच अश्लिल  शिवीगाळ करत महिलेचा विनयभंग केला. हा प्रकार घडल्यानंतर महिलेने धरणगाव पोलिसात अशोक भिल याच्या विरोधात तक्रार दिली आहे. त्यानुसार दुपारी २ वाजता संशयित आरोपी अशोक हिरामण भिल याच्या विरोधात धरणगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल विठ्ठल पाटील करीत आहे.

Protected Content