रामानंद नगर पोलीसात गुन्हा दाखल
जळगाव- लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । पिंप्राळा परिसरातील मुंदळा मळा येथे तरूणाचे बंद घर फोडून रोख रकमेसह सोन्याचे दागिने, मोबाईल व रोकड असा एकुण ४० हजारांचा ऐवज चोरून नेल्याची घटना बुधवारी ४ ऑक्टोबर रोजी पहाटे ३ वाजेच्या सुमारास उघडकीला आली आहे. याप्रकरणी गुरूवारी ५ ऑक्टोबर रात्री १० वाजता रामानंद नगर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत अधिक असे की, केशव गणेश मंजाटे (वय-३३) रा. मुंदळा मळा पिंप्राळा, जळगाव हा तरूण आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. शेतीचे काम करून आपला उदरनिर्वाह करतो. मंगळवारी ३ ऑक्टोबर रात्री १० ते बुधवार ४ ऑक्टोबर पहाटे ३ वाजेच्या सुमारास अज्ञात व्यक्तीने घराचा दरवाजा उघडून आत प्रवेश करत घरातून सोन्याची पोत, मोबाईल व रोकड असा एकुण ४० हजार रूपये किंमतीचा मुद्देमाल चोरून नेल्याचे समोर आले आहे. हा प्रकार लक्षात आल्यानंतर गुरूवारी ५ ऑक्टोबर रोजी तरूणाने रामानंद नगर पोलीसात धाव घेवून तक्रार दिली. त्याने दिलेल्या तक्रारीवरून अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ संजय सपकाळे करीत आहे.