चिंताजनक : जळगाव जिल्ह्यात आणखी दोन कोरोनाबाधित रूग्ण; रुग्णांची संख्या ६० वर

जळगाव प्रतिनिधी । पाचोरा व पारोळा येथे स्वॅब घेतलेल्या १४ कोरोना संशयित व्यक्तींचे नमुना तपासणी अहवाल आता नुकतेच प्राप्त झाले आहे. यापैकी १२ व्यक्तीचे तपासणी अहवाल निगेटिव्ह आले आहे. तर दोन व्यक्तीचे तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आले आहे.

पॉझिटिव्ह आढळलेल्या दोन्ही  व्यक्ती ह्या पाचोरा शहरातील असून त्या ३० व ३६ वर्षीय पुरूष आहे. निगेटिव्ह अहवाल आलेल्यांमध्ये दहा व्यक्ती पाचोरा येथील तर दोन व्यक्ती पारोळा येथील आहे.

जिल्ह्यात आज तीन कोरोना बाधित रूग्ण आढळून आले आहे. आतापर्यंत कोरोना बाधित रूग्णांची संख्या ६० इतकी झाली आहे. त्यापैकी तेरा रूग्णांचा मृत्यू झाला आहे. तर दोन व्यक्ती कोरोनामुक्त झाल्या आहेत. अशी माहिती जिल्हा  प्रशासनाच्यावतीने देण्यात आली आहे.

Protected Content