जळगाव प्रतिनिधी । दारूच्या अतिसेवनामुळे गुजराथी गल्लीत राहणारा 32 वर्षाच्या तरूणाचा मृत्यू झाला. याबाबत जिल्हा पेठ पोलीसात आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
पोलीसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, अमित चंद्रकांत वाणी (वय-32) रा. गुजराथी गल्ली, जिल्हा पेठ याला दारूचे व्यसन होते. गेल्या आठवड्यापासून अतिदारू पिल्याने आजारी होता. आज सकाळी 9 वाजता राहत्या घरी अत्यवस्थ वाटू लागले. त्याला उपचारार्थ जिल्हा शासकिय रूग्णालयात उपचारार्थ दाखल केले असता वैद्यकिय अधिकारी यांनी मृत घोषीत केले. याबाबत जिल्हापेठ पोलीसात आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आलीय.