रावेर येथे शायनिंग स्टार्स अकॅडमीतर्फे गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार

1be6cb59 3e4d 41c3 80c1 41706a7c1a28

रावेर (प्रतिनिधी) आजच्या स्पर्धात्मक युगात शालेय संस्था आणि शैक्षणिक क्षेत्रात काम करणाऱ्या संस्था यांनी आपल्या संस्थांमध्ये विद्यार्थ्यांना आयुष्यातील वास्तवात जगण्यासाठी स्पर्धात्मक शिक्षण देणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन श्रीराम उद्योग समूहाचे प्रमुख श्रीराम पाटील यांनी येथे शायनिंग स्टार्स अकॅडमीतर्फे आयोजित गुणवंत विद्यार्थी सत्कार सोहळ्यात अध्यक्षीय भाषणात मार्गदर्शन करतांना केले.

 

या प्रसंगी प्रतिमापूजन आदर्श विद्यालय केरहाळे अध्यक्ष सुधाकर पाटील, पद्माकर महाजन, माजी नगराध्यक्ष हरीश गणवानी यांच्याहस्ते करण्यात आले तर दीप प्रज्वलन सरस्वती विद्या मंदिर संस्था अध्यक्ष दिलीप अग्रवाल, शिवसेना जिल्हा उपप्रमुख प्रल्हाद महाजन, महाराष्ट्र विद्या मंदिर संस्थेचे अध्यक्ष अरविंद पाठक, समृद्धी स्कुल चेअरमन अमोल पाटील, स्वामी विद्यालयाचे रवींद्र पवार, खाजगी कोचिंग क्लासेस संघटनेचे राज्य कार्याध्यक्ष भैय्यासाहेब मगर, डी.एम. भोई, आदी मान्यवर उपस्थित होते.

प्रास्ताविकात संजय चौधरी यांनी संस्थेच्या वाटचालीचा आढावा घेतला. शिक्षण पद्धती बळकटीकरण करण्यासाठी सर्वांनी सामूहिक प्रयत्न करणे आवश्यक असल्याचे ते यावेळी म्हणाले. यावेळी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन हृदयेष पाटील यांनी केले तर आभार निलेश महाजन यांनी मानले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी संचालिका सौ. संगीत चौधरी, प्रकाश चौधरी, सेंटरप्रमुख सौ. नंदा जंगले, दीपक नगरे यांचेसह सर्व शिक्षक आणि कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.

Protected Content