यावल-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । मध्यप्रदेशातील परप्रांतीय नागरीकांकडून होणारे सातपुडा पर्वताच्या वन जमिनीवरील बेकायद्याशीर अतिक्रमण, गाव परिसरातील वारंवार शेतकऱ्यांच्या होणाऱ्या केबल वायर चोऱ्यासंदर्भात पोलीस प्रशासनाकडे दाद मागणे व आदी स्थानिक नागरीक सुविधांचे प्रश्न यावल तालुक्यातील वड्री ग्रामपंचायतच्या ग्रामसभेत मंजुरी देत ग्रामसभा शांततेच्या वातावरणात संपन्न झाली. यात वनजमिनीवरील बेकायदेशीर अतिक्रमण काढण्यात येणार असा ठराव ग्रामसभेत मंजूर करण्यात आला.
वड्री तालुका यावल येथे ग्रामपंचायतच्या आवारात गावाचे सरपंच अजय भालेराव यांच्या अध्यक्षतेखाली ग्रामसभा शांततेच्या वातावरणार पार पडली. या ग्रामसभेत सातपुडा पर्वताच्या जंगलात गेल्या अनेक दिवसापासुन सातपुड्याच्या वन जमिनीवर शेजारचे राज्य मध्यप्रदेश या परप्रांतीय राज्यातुन शेकडो नागरिक आदिवासी म्हणुन बेकायद्याशीर वन जमीनीवर अतिक्रमण करून राहात आहे. स्थानिक आदिवासींच्या हक्काच्या सवलती त्यांना देण्यात येत असल्याचा प्रश्न यावेळी आदिवासी समाज बांधवांनी उपस्थित केला. यावेळी वनविभाग, वन व्यवस्थापन समिती व ग्राम पंचायतच्या वतीने संयुक्त कारवाई करीत ही अतिक्रमण काढण्याच्या ठरावास मंजुरी देण्यात आली.
याशिवाय मोदी आवास योजना , वन व्यवस्थापन समितीमार्फत एससी / एस टी / ओबीसी वैयक्तीक गॅस वाटप करण्यास मंजुरीसह स्मशानभुमी / आदिवासी बांधवांची क्रबस्तान ( दफनभुमी ) ठीकाणी संरक्षण भिंत बांधणे , गावात शौचालय बांधणे या विषया मंजुरी देण्यात आली . शिक्षण,आरोग्य,महिला बाल कल्याण /समाजकल्याण / शबरी योजना /रमाई घरकुल योजना या संदर्भात लाभ घेणाऱ्या नागरीकांना ग्रामसेवक मजित तडवी सविस्तर माहिती देत या समाज उपयोगी योजनांचे लाभ घेण्याचे आवाहन केले.
या ग्रामसभेस सरपंच अजय भालेराव , उपसरपंच पंकज चौधरी , ग्रा.पं.सदस्य नबाब तडवी, सरदार तडवी, वैशाली चौधरी, कविता पाटील, नयना चौधरी, सलमा तडवी, फिजा तडवी यांच्यासह वनपाल रविन्द तायडे, वनरक्षक जी बी डोंगरे, कृषी विभागाचे जी.बी. निंबोळकर, पोस्ट विभागाचे अधिकारी शेख, आदिवासी चळवळीचे कार्यकर्ते बशीर तडवी, अय्युब तडवी, माजी पोलीस पाटील गोविंदा सुरवाडे यांच्यासह ग्रामस्थमंडळी या ग्रामसभेला मोठया संख्येत उपस्थित होते. ग्रामसभेची प्रस्तावना व उपस्थितांचे आभार ग्रामसेवक मजीत तडवी यांनी मानले.