सतपंथ प्रेरणापीठ मार्फत अकरा टन प्रसाद अयोध्याकडे रवाना

फैजपूर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | अयोध्या येथील श्री रामलल्ला मंदिर प्राणप्रतिष्ठा महोत्सवासाठी भाविकांसाठी सतपंथ संप्रदायाचे मुख्य स्थान असलेले तीर्थधाम प्रेरणापीठ अहमदाबाद गुजरात येथून तब्बल अकरा टन इतका प्रसाद रवाना करण्यात आला आहे.

जगद्गुरु श्री ज्ञानेश्वर देवाचार्यजी महाराज यांच्या प्रेरणेने व देवजीभाई पटेल ( मुंबई ) यांच्या मार्गदर्शनाने सतपंथ परिवारा मार्फत ११ टन चिक्कीचा प्रसाद पाठवण्यात आला आहे. २५ ग्रॅमचे एक पॅकेट अशी सहा लाख पाकिटे तयार केली आहेत.

यासोबतच अयोध्या येथे आलेल्या संत महात्म्यांच्या भोजन वितरणाची सेवा सुद्धा सतपंथ परिवाराला मिळाली आहे. त्यासाठी शेकडो स्वयंसेवक आयोध्याकडे रवाना झाले आहेत. अयोध्यातील ऐतिहासिक आयोजनात प्रसादाची व सेवेची संधी मिळाल्याने सतपंथ परिवारात उत्साहाचे वातावरण आहे असे अखिल भारतीय संत समितीचे खजिनदार महामंडलेश्वर जनार्दन हरी जी महाराज यांनी सांगितले.

अयोध्या श्रीराम जन्मभूमी आंदोलनात महामंडलेश्वर जनार्दन हरी जी महाराज यांचा सक्रिय सहभाग राहिला आहे. यामुळेच ५ ऑगस्ट २०२० रोजी झालेल्या भूमिपूजन प्रसंगी सुद्धा निवडक संतांच्या यादीत महाराष्ट्रातून फैजपुर येथील सतपंथ संस्थानचे गादिपती जनार्दन हरि जी महाराजांचे नाव निमंत्रितांमध्ये अग्रस्थानी होते. तर आता त्यांना प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचे देखील निमंत्रण मिळाले आहे.

Protected Content