भुसावळ-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । शहरातील पंचशिल नगरातील मिस्जिद जवळ जुन्या भांडणाच्या कारणावरून दहावीत शिकणाऱ्या विद्यार्थ्याच्या सायकलला धडक देवून चाकूने वार करून जखमी केल्याची घटना घडली. याप्रकरणी भुसावळ बाजारपेठ पोलीस ठाण्यात चार जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
भुसावळ पोलीसांनी दिलेली माहिती अशी की, शाहीम शेख मुजाहिद (वय-१६) रा. मटन मार्केटजवळ, भुसावळ हा विद्यार्थी आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. सध्या दहावीचे शिक्षक घेत आहे. सोमवारी २१ ऑगस्ट रोजी रात्री सोडआठ वाजता शाहीम शेख हा सायकलीने जात असतांना शेख तौसिफ उर्फ बाबू शेख फिरोज दुचाकीने जात असतांना शाळकरी मुलाच्या सायकलला धडक दिली. याचा जाब विचारला असता शेख तौसिफ याने चाकू काढून पायावर व हातावर मारून दुखापत केली. तसेच रेहान शेख फिरोज, फिरोज शेख आणि शेरा उर्फ गोलू शेख फिरोज शेख सर्व रा. पंचनिशल नगर, भुसावळ यांनी देखील चापटाबुक्क्यांनी बेदम मारहाण केली. जखमी झालेल्या शाहीम शेख याला भुसावळ ग्रामीण रूग्णालयात दाखल करण्यात आले. उपचार घेतल्यानंतर शुक्रवार २५ ऑगस्ट रोजी रात्री १० वाजता भुसावळ बाजार पेठ पोलीस ठाण्यात चौघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास महिला पोहेकॉ अर्चना अहिरे करीत आहे.