गेमींग झोनमधील आगीत २७ जणांचा बळी : रात्री उशीरा आगीवर नियंत्रण

राजकोट-वृत्तसंस्था | येथील गेमींग झोनला लागलेल्या भीषण आगीत २७ जणांचा मृत्यू झाला असून रात्री उशीरा आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आल्याचे वृत्त आहे.

गुजरातच्या राजकोट शहरातील एका गेमिंग झोनमध्ये शनिवारी संध्याकाळी भीषण आग लागली. यामध्ये जवळपास २७ लोकांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. टीआरपी गेम झोन येथे लागलेल्या आगीत अनेक लहान मुले आणि मोठी माणसे अडकले असल्याची भीती व्यक्त केली जात होती. अग्निशामक दलाच्या चार गाड्या घटनास्थळी दाखल झाल्याअसून आगीवर नियंत्रण मिळविण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू करण्यात आले.

दरम्यान, रात्री उशीरा आगीवर नियंत्रण मिळविण्यात यश आले असले तरी हा गेमींग झोन पूर्णपणे जळून खाक झाला असून मृतांची संख्या वाढण्याची भिती व्यक्त करण्यात येत आहे. तरल राजकोटचे पोलीस आयुक्त राजू भार्गव यांनी युवराज सिंह सोलंकी या गेमिंग झोनच्या मालकावर निष्काळजीपणाचा आणि त्यामुळे मृत्यू झाल्याचा गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आल्याची माहिती दिली.

Protected Content