भुसावळातील आनंद लॉजवर छापा; पाच महिलांसह ग्राहक ताब्यात

भुसावळ – लाइव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । शहरातील पांडूरंग टॉकीजजवळील आनंद लॉजमध्ये भुसावळ पोलीसांनी छापा टाकून वेश्या व्यवसाय करणाऱ्या पाच महिलांसह आंबटशौकीन ग्राहकांना पोलीसांनी ताब्यात घेतले आहे. या कारवाईमुळे भुसावळ शहरात खळबळ उडाली आहे.

शहरातील पांडूरंग टॉकीजजवळील आनंद लॉज येथे वेश्या व्यवसाय सुरू असल्याची माहिती पोलीस उपअधीक्षक सोमनाथ वाघचौरे यांना गोपनिय माहिती मिळाली. त्यानुसार सोमवारी २१ मार्च रोजी सकाळी दुपारी भुसावळ पोलीसाच्या पथकाने अचानक छापा टाकला. सुरूवातील पोलीसांना पाहून ग्राहकांची चांगलीच धांदल उडाली. यात वेश्या व्यवसाय करणाऱ्या पाच महिला आणि पाच आंबटशौकीनांना ताब्यात घेतले आहे. दरम्यान, बेकायदेशीर व अनैतीक व्यवसाय सुरू ठेवल्याप्रकरणी हॉटेल मॅनेजरसह मालकाला ताब्यात घेतले आहे.

Protected Content