सोमेश्वर महादेव मंदीरात दर्शनासाठी भाविकांची अलोट गर्दी

जामनेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । श्रावण महिन्यातील सोमवार आणि नागपंचमी असल्यामुळे जामनेर शहरातील सोमेश्वर महादेव मंदीरात दर्शनासाठी भाविकांनी एकच गर्दी केल्याचे पहायला मिळाले. मंत्री गिरीश महाजन व पत्नी साधना महाजन यांच्याहस्ते मंदीरात आरती करण्यात आली.

 

आज श्रावणचा पहिला सोमवार व नागपंचमी असल्यामुळे भाविकांसाठी ठरणारा योग असून यामुळे जामनेर शहरातील सोमेश्वर महादेव मंदिरावर राज्याचे ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन व त्यांच्या पत्नी नगराध्यक्ष साधना महाजन यांनी महादेव मंदिरात दर्शन घेऊन आरती केली. यावेळी राज्यातील जनता सुखी समृद्धी हो व चांगल्या प्रकारे पाऊस पडो अशी कामना केली त्याचबरोबर येणाऱ्या काळात जामनेर शहराची शोभा वाढवणारी सोनबर्डी व सोमेश्वर महादेव मंदिर परिसरामध्ये सुशोभीकरण करण्यात येणार असून मोठ्या प्रमाणावर भाविक भक्तांना या ठिकाणी दर्शन व पर्यटनाच्या लाभ मिळणार असल्याची माहिती ग्रामविकास  मंत्री महाजन यांनी पत्रकारांशी बोलताना दिली यावेळी सोमेश्वर महादेव मंदिरावर दर्शनासाठी मोठ्या प्रमाणावर भाविकांची गर्दी पाहायला मिळाली.

Protected Content