शेंदुर्णी, ता. जामनेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | येथील आप्पासाहेब गरूड महाविद्यालयात नुकताच युवा संवाद व नवमतदार नोंदणी कार्यक्रम पार पडला.
तहसील कार्यालयातर्फे महसूल महसूल सप्ताह साजरा केला जात असून या माध्यमातून शेंदुर्णी येथील आप्पासाहेब गरुड कला वाणिज्य व महाविद्यालयामध्ये नवीन मतदार नोंदणी व युवा संवाद कार्यक्रम तहसीलदार नानासाहेब आगळे यांच्या उपस्थितीत झाला यावेळी नायब तहसीलदार व शाळेतील शिक्षक उपस्थित होते.
जामनेर तहसील कार्यालयामार्फत महसूल सप्ताह अंतर्गत विविध कार्यक्रम राबवले जात असून शेंदुर्णी येथील गरुड महाविद्यालयामध्ये नवीन मतदार नोंदणी व महसूल विभागामार्फत घरपोच दाखल्याचे वाटप तहसीलदार नानासाहेब आगळे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी कार्यक्रमात तहसीलदार नानासाहेब आगळे आगळे यांनी विविध विषयावर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले त्याचबरोबर कोणतेही प्रकारे अडीअडचणी आल्यास तहसील कार्यालय जामनेर यांची संपर्क साधण्याचे आवाहन या कार्यक्रमात उपस्थित त्यांना तहसीलदार यांनी केले आहे.