दुचाकी अपघातात तरूण जखमी

जळगाव- लाईव्ह ट्रेंड्स न्युज प्रतिनिधी ।जळगाव तालुक्यातील उमाळा घाट येथे दोन समोरासमोर दुचाकीच्या अपघातात दुचाकीस्वार जखमी झाल्याची घटना घडली होती. या अपघात प्रकरणी बुधवार २ ऑगस्ट रोजी रात्री ९ वाजता अज्ञात दुचाकीस्वाराच्या विरोधात एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

एमआयडीसी पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, ललीत नामदेव बेलदार (वय-२८) रा. नेरी ता.जामनेर हा तरूण आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. २८ जुलै रोजी रात्री ८ वाजेच्या सुमारास ललीत बेलदार हे दुचाकीने नेरी येथे जाण्यासाठी उमाळा घाटातून जात असतांना समोरून येणारी दुचाकी क्रमांक (एमएच १९ एव्ही ९३६२) ने जोरदार धडक दिली. या धडकेत ललीत बेलदार हा तरूण जखमी झाला. त्याला रस्त्यावरील वाहनधारकांनी तातडीने खासगी वाहनातून जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचारार्थ दाखल केले. या अपघात प्रकरणी बुधवार २ ऑगस्ट रोजी रात्री ९ वाजता दुचाकीवरील अज्ञात व्यक्तीवर एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ गफार तडवी करीत आहे.

Protected Content