अमेस्टोच्या उपाध्यक्षपदी सैय्यद अजगर सैय्यद यांची नियुक्ती

सावदा, प्रतिनिधी  । ऑल महाराष्ट्र मायनॉरिटी एज्युकेशन सोसायटीज अँड टीचर्स ऑर्गनाइज़ेशन ( अमेस्टो) या संघटनेच्या उपाध्यक्षपदी सैय्यद अजगर सैय्यद यांची नियुक्ती करण्यात आली आहे. 

 

राज्य स्तरावर शैक्षणिक संस्था, शिक्षक व विद्यार्थी यांच्या विविध ज्वलंत समस्या निर्भयपणे व एकजुटीने सोडविण्यासाठी राज्यात शैक्षणिक क्षेत्रात ऑल महाराष्ट्र मायनॉरिटी एज्युकेशन सोसायटीज अँड टीचर्स ऑर्गनाइजेशन ( अमेस्टो) स्थापन झाली असून त्याच्या उपाध्यक्षपदी सैय्यद अजगर सैय्यद यांची ३ वर्षाकरिता नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांना नुकतेच अध्यक्ष ए. एम. देशमुख यांनी नियुक्ती पत्र दिले आहे. त्यांचे सर्वत्र अभिनंदन करण्यात येत आहे.

Protected Content