पहूर येथे ‘मिशन इंद्रधनुष्य २.०’ अंतर्गत पथनाट्य सादर

pahur news

पहूर, ता.जामनेर, प्रतिनिधी | येथील बसस्थानक परिसरात आज (दि.२९) सकाळी ८.०० वाजता औरंगाबाद येथील आभा कला मंच यांच्यातर्फे भारत सरकार रिजनल आउटरीच युरो भारत सरकार सूचना व प्रसारण मंत्रालय तसेच गित व नाटक विभाग पुणे महिला व बाल विकास मंत्रालय भारत सरकार यांच्या संयुक्त विद्यमानाने ‘मिशन इंद्रधनुष्य २.०’ अंतर्गत संपूर्ण लसीकरण या विषयावर गीत नाट्याच्याच्या माध्यमातून कार्यक्रम सादर करण्यात आला.

 

याद्वारे बाळाच्या संपूर्ण लसीकरणाचे फायदे व गरज सांगण्यात आले. या कार्यक्रमात कलावंत मदन मिमरोट, के.एस. नवतुरे, श्रीमती रेखा शेगावकर, नामदेव किरण कुमार जाधव, छाया साळवे, युवराज सुतार ,राहुल दाभाडे, यांच्यासह सहकाऱ्यांनी गीत व नाट्य सादर करून लसीकरण संदर्भात माहिती दिली. यावेळी स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Protected Content