जामनेरात चोरीचा प्रयत्न फसला; दोन दुचाकींसह चौघांला अटक (व्हिडीओ)

जामनेर प्रतिनिधी । शहरातील पद्मावती ड्रायफूट व नमकीन दुकानात चोरीच्या प्रयत्नात आलेल्या चार जणांना जामनेर पोलीसांनी अटक केली आहे. चौघांकडून दोन दुचाक्या आणि चोरी करण्याचे साहित्य हस्तगत केले आहे. चारही संशयित आरोपी हे जळगाव शहरातील असल्याचे समोर आले आहे. 

सविस्तर माहिती अशी की, जामनेर शहरात मध्यरात्री २ वाजेच्या सुमारास शहरातील नगर भागातील पद्मावती व नमकीन या दुकानात चोरी करण्यासाठी चार चोरटे दुचाकीने आले. त्याचवेळी पोलीस कर्मचारी पेट्रोलिंग करत होते. यावेळी पोलीसांनी काही संशयास्पद हालचाली दिसून आल्यात. त्यावेळी दुकानात जवळ गेले असता एका चोरट्यास पकडले तर इतर तिघे अंधाराचा फायदा घेवून पळ काढला. पोलीसांनी तिघांना पाठलाग करून पकडले. त्याच्याकडून दोन मोटारसायकली आणि चोरी करण्याचे साहित्य हस्तगत केले आहे. 

गुरूदयाल सिंग मनजीत सिंग टाक रा. तांबापुरा जळगाव, विशाल सजन चव्हाण रा. हरीविठ्ठल नगर जळगाव, विकास रवींद्र कोळी रा. हरी विठ्ठल नगर जळगाव आणि रवी प्रकाश चव्हाण तांबापुर जळगाव अशी चारही संशयितांची नावे आहेत. अमोल वासुदेव घुगे यांच्या फिर्यादीवरून  जामनेर पोलीस कलम 451 380 511 प्रमाणे गुन्हा दाखल झाला आहे.  जामनेर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक प्रताप इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस कॉन्स्टेबल ज्ञानेश्वर देशमुख, पोलीस कॉन्स्टेबल अमोल वंजारी, चंद्रकांत पाटील, अमोल सोनवणे अमोल घुगे, संदीप पाटील यांच्या पथकाने केली आहे.

 

Protected Content