जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । पोलिसात तक्रार केल्याचे वाईट वाटल्याने एकाने तरुणीच्या घरात घुसून तिला अश्लिल शिवीगाळ करत तिचा विनयभंग केल्याची घटना शहर पोलीस ठाणे हद्दीतील एका भागात सोमवार १७ जुलै रोजी पावणे दहा वाजेच्या सुमारास घडली. याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
अधिक माहिती अशी की, जळगाव शहरातील एका भागात तरुणी तिच्या कुटुंबासह वास्तव्यास आहे. तरुणीने कल्पेश ऊर्फ बाळा देवीदास शिंपी यांच्याविरोधात पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. या तक्रारीचा राग आल्याने कल्पेश याने तरुणीचा वेळावेळी पाठलाग करत तिला शिवीगाळ केली, सोमवारी १७ जुलै रोजी तरुणी ही घरी असताना कल्पेश आला, त्याने तरुणीच्या घरात प्रवेश करुन तिला अश्लिल शिवीगाळ करत, तिच्यावर बलात्कार करण्याची धमकी दिली, याचदरम्यान तरुणीचा विनयभंग केला, अशी तक्रार तरुणीने शहर पोलीस ठाण्यात दिली असून या तक्रारीवरुन कल्पेश शिंपी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरिक्षक रमेश शेंडे हे करीत आहेत.