जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव तालुक्यातील मामुराबाद गावाजवळील असलेल्या पेट्रोल पंपाजवळ पैसे न देण्याच्या कारणावरून एका मजुराला हातातील फायटरने मारहाण केल्याने डोक्याला गंभीर दुखापत केल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी जळगाव तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीस सूत्रांकडून मिळालेली माहिती अशी की, किरण सुकराम कोळी (वय-२९) रा. नांद्रा बुद्रुक ता.जि. जळगाव हा तरुण परिवारासह वास्तव्याला आहे. मोलमजुरीचे काम करून आपला कुटुंबाचा उदरनिर्वाह करतो. रविवारी १६ जुलै रोजी दुपारी २ वाजेच्या सुमारास किरण कोळी हा ममुराबाद गावानजीकच्या व्ही पेट्रोल पंपाजवळ जात असताना मुकेश सुरेश कोळी रा. मिलखेडा ता. जि. जळगाव याने किरण यांच्याकडे पैसे मागितले. त्यावर किरण कोळी याने पैसे दिले नाही, याचा राग मुकेश कोळी याला आल्याने त्याने हातातील फायटर डोक्यात व कानावर मारून दुखापत केली. गंभीर जखमी झालेल्या किरण कोळी याला शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. याप्रकरणी सायंकाळी ७ वाजता किरण कोळी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून संशयित आरोपी मुकेश कोळी यांच्या विरोधात जळगाव तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल सुधाकर शिंदे करीत आहे.