जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहरातील बेंडाळे चौकात रिक्षा चालकाला दमदाटी करून मोबाईल हिसकावल्याप्रकरणी शनीपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्यातील तीन जणांना गेंदालाल मिल परिसरातून सोमवारी १७ जुलै रोजी दुपारी २ वाजता अटक केली आहे. तर चौथा फरार झाला असून त्याचा शोध सुरू आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, निलेश उर्फ रायबा शांताराम जोशी (वय-३०) हे आपल्या परिवारासह जोशी कॉलनीत वास्तव्याला आहे. रिक्षा चालवून आपला उदरनिर्वाह करतात. शनिवारी १५ जुलै रोजी सकाळी ९ वाजेच्या सुमारास बेंडाळे चौकात रिक्षा घेवून उभे असतांना त्या ठिकाणी अंकुश मधुकर सुरवाडे रा. गेंदालाल मील जळगाव, भुऱ्या (पुर्ण नाव माहित नाही) रा. भारत नगर, जळगाव, शमिर मालक रा. गेंदालाल मील, जळगाव आणि मयूर पाटील रा. वाघ नगर, जळगाव या चौघांनी दमदाटी करून रिक्षा चालकाच्या खिश्यातील मोबाईल जबरी हिसकावून लांबविला होता. याप्रकरणी शनीपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्यातील संशयित आरोपी अंकुश सुरवाडे, भूऱ्या, आणि मयूर पाटील यांना अटक केली आहे. ही कारवाई पोलीस निरीक्षक विशाल जैस्वाल यांच्या मार्गदर्शनाखाली पोलस उपनिरीक्षक प्रिया दातीर, पोहेकॉ परिष जाधव, पोहेकॉ गिरीश पाटील, राहूल पाटील, अनिल कांबळे, मुकुंद गंगावणे यांनी केली आहे.