Home Cities जळगाव कोरोना : जिल्ह्यात आज एक बाधित रूग्ण आढळला

कोरोना : जिल्ह्यात आज एक बाधित रूग्ण आढळला


जळगाव प्रतिनिधी । जळगाव जिल्हा कोरोना अहवालात आज दिवसभरातून एक बाधित रूग्ण आढळून आला आहे. तर एक रूग्ण बरा होवून घरी परतला आहे. अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. एन.एस.चव्हाण यांनी एका प्रसिध्दीपत्रकाद्वारे दिली आहे.

 

जळगाव जिल्ह्यातील यावल तालुक्यात आज एक बाधित रूग्ण आढळून आला आहे. जिल्ह्यात आजपर्यंत एकुण १ लाख ४२ हजार ७८७ बाधित रूग्ण आढळून आले आहे. त्यापैकी १ लाख ४० हजार २०६ रूग्ण बरे होवून घरी परतले आहे. आतापर्यंत एकुण २ हजार ५७७ रूग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. एन.एस.चव्हाण यांनी दिली आहे.


Protected Content

Play sound