मुक्ताईनगर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | शेतकर्यांना प्राधान्याने खताचा पुरवठा करा असे नमूद करतांनाच खतांची चढ्या दराने विक्री करणार्यांवर कारवाई करण्याचे निर्देश आमदार चंद्रकांत पाटील यांनी केले. ते येथील आढावा बैठकीत बोलत होते.
आमदार चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली कृषी आणि महसूल विभागाची संयुक्त आढावा बैठक शासकीय विश्रामगृहात घेण्यात आली. यात आमदार चंद्रकांत पाटील यांनी खरीप हंगामात शेतकर्यांची फसवणूक होऊ नये यासाठी प्रशासनाने दक्ष राहण्याचे आवाहन केले. ते म्हणाले की, शेतकरी बांधवांच्या मागणीप्रमाणे युरिया , डी ए पी व १०:२६:२६ या रासायनिक खतांचा पुरवठा वेळेत व्हावा, कुठेही लिंकिंग होऊ नये तसेच प्राप्त खतांच्या साठ्याची माहिती याबाबत प्रशासनाने पारदर्शकतेने काम करावे.
शेतकर्यांना खतांचा प्राधान्य क्रमाने पुरवठा होत असतांनाच यात त्यांची कोणत्याही प्रकारे फसवणूक होऊ नये म्हणून काळजी घेण्याचे निर्देश देखील आमदार चंद्रकांत पाटील यांनी या बैठकीत दिलेत.
यावेळी जळगाव जिल्हा परिषदेचे जिल्हा कृषी अधिकारी राहुल महाजन, कृषी विकास अधिकारी जळगाव सुरज जगताप, तहसीलदार रावेर बंडू कापसे, मुक्ताईनगरचे प्रभारी निकेतन वाळे, रावेर तालुका कृषी अधिकारी भाऊसाहेब वाळके, बोदवड तालुका कृषी अधिकारी सी.जी पाडवी, मुक्ताईनगर तालुका कृषी अधिकारी अभिनव माळी, कृषी अधिकारी पंचायत समिती रावेर एस. ए. पाटील, कृषी अधिकारी पंचायत समिती मुक्ताईनगर धीरज हिवराळे, कृषी अधिकारी पंचायत समिती बोदवड प्रदीप धांडे, संगायो समितीचे अध्यक्ष अनंतराव देशमुख आदींची उपस्थिती होती.