Home धर्म-समाज मुक्ताई मंदिराच्या मागील बाजूला उमटली श्री विठ्ठलाची प्रतिमा !

मुक्ताई मंदिराच्या मागील बाजूला उमटली श्री विठ्ठलाची प्रतिमा !

0
92


मुक्ताईनगर-पंकज कपले ( Exclusive ) | येथील नवीन श्री संत मुक्ताई मंदिराच्या मागील बाजूला फेरी मारतांना श्री विठ्ठलाची प्रतिमा साकारल्याचे दिसून आले असून याबाबत भाविकांमध्ये एकच चर्चा आहे.

या संदर्भातील वृत्त असे की, लाईव्ह ट्रेंडस न्यूजचे प्रस्तुत प्रतिनिधी पंकज कपले हे काल सपत्नीक नवीन मुक्ताई मंदिरात दर्शन घेण्यासाठी गेले होते. दर्शन घेतल्यानंतर प्रदक्षिणा मारतांना मागील बाजूला आले असता त्यांना श्री विठ्ठलाची प्रतिमा साकारल्याचे दिसून आले. या ठिकाणी प्रत्येक भाविक माथा टेकत असल्याने थोडासा काळसर भाग पडला असून यातूनच श्री विठ्ठलाची बाह्याकृती तयार झाल्याचे दिसून येत आहे.

पंकज कपले यांनी या संदर्भात उपस्थित भाविकांशी चर्चा केली असता त्यांनी देखील याबाबत आश्‍चर्य व्यक्त केले. ही प्रतिमा कोणता चमत्कार वा अंधश्रध्दा नसून भाविकांच्या माथा टेकवल्यामुळे तयार झालेल्या स्पॉटमधून दिसून येत आहे. एकादशीच्या आधी हा योगायोग दिसून आल्याबद्दल पंकज कपले आणि त्यांच्या सौभाग्यवतींनी आनंद व्यक्त केला आहे.


Protected Content

Play sound