जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव तालुक्यातील फुपणी गावात राहणाऱ्या ४५ वर्षीय महिलेचा विजेच्या धक्क्याने मृत्यू झाल्याची घटना सकाळी ८ वाजता घडली आहे. याप्रकरणी जळगाव तालुका पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. जिजाबाई रोहिदास भिल (वय-४५) रा. फुपणी ता.जि.जळगाव असे मृत झालेल्या महिलेचे नाव आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, जिजाबाई भिल या महिला आपल्या पती व दोन मुलांसह वास्तव्याला आहे. शेतीचे काम करून आपला उदरनिर्वाह करतात. शुक्रवारी २३ जून रोजी सकाळी साडेबारा वाजेच्या सुमारास घरी पाण्याची मोटार सुरू करण्यासाठी गेल्या असता त्यांना विजेचा जोरदार धक्का बसला. त्यात त्यांचा जागीच मृत्यू झाला. त्यांना तातडीने नातेवाईकांनी जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल केले असता वैद्यकीय अधिकारी यांनी मयत घोषीत केले. यावेळी नातेवाईकांनी जिल्हा शासकीय रूग्णालयात गर्दी केली होती. शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला आहे. याप्रकरणी जळगाव तालुका पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.




