Home राज्य दहावीचा निकाल उद्या दुपारी १ वाजता होणार जाहीर

दहावीचा निकाल उद्या दुपारी १ वाजता होणार जाहीर

kg6
kg6

kg6
 

पुणे (वृत्तसंस्था) गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर दहावीच्या निकालाबाबत अफवा पसरल्या होत्या. आज अखेर बोर्डाने उद्या म्हणजेच आठ जून रोजी दहावीचा निकाल जाहीर होणार असल्याचे स्पष्ट केले आहे. उद्या दुपारी एक वाजाता बोर्डाच्या अधिकृत संकेतस्थळावर दहावीचा निकाल पाहाता येणार आहे.

 

दहावीच्या निकालाच्या तारखांविषयी गेल्या आठवड्यापासून व्हॉट्सअॅपवर वेगवेगळे मेसेज फिरत होते. त्यामुळे विद्यार्थी आणि पालकांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले होते मात्र, आता बोर्डाकडून अधिकृत दहावीच्या निकालाची तारीख जाहीर करण्यात आली आहे. नऊ विभागीय मंडळांतर्फे एक मार्च ते २२ मार्चदरम्यान घेण्यात आलेल्या दहावीच्या परीक्षेला यंदा राज्यभरातून १७ लाखांपेक्षा आधिक विद्यार्थी बसले होते. दरम्यान, maharashtraeducation.com, mahresult.nic.in, आणि mahahsscboard.maharashtra.gov.in. या संकेतस्थळावर पाहता येणार आहे.

 

 

येथे पाहू शकाल निकाल –

maharashtraeducation.com
mahresult.nic.in
mahahsscboard.maharashtra.gov.in.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Protected Content

Play sound