रावेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या अत्यंत चुरशीच्या निवडणुकीत महाविकास आघाडी प्रणीत शेतकरी विकास पॅनलला स्पष्ट बहुमत मिळाले असून भाजप व प्रहार जनशक्तीच्या पॅनलला धक्का बसला आहे.
रावेर कृषी उपन्न बाजार समितीच्या निवडणुकीत मोठी चुरस दिसून आली होती. रावेर कृषी उपन्न बाजार समिती महाविकास आघाडी पुरस्कृत शेतकरी विकास पॅनल भाजपा-सेना पुरस्कृत लोकमान्य शेतकरी पॅनल तसेच जनशक्ती प्रहार पुरस्कृत परीर्वतन शेतकरी पॅनल तिन पॅनलसह अपक्षांमध्ये १८ जागांसाठी ५१ उमेदवारांमध्ये लढत होती. येथील यशवंत विद्यालयात सात बूथ वर मतदान घेण्यात आले.यासाठी व्यापारी २ सोसायटी २ ग्राम पंचायत २ हमाल मापाडी १ असे एकूण सात मतदान केंद्रावर मतदान पार पडले. २ हजार ६५२ मतदारां पैकी २ हजार ५३६ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला.
सोसायटी मतदार संघात ७४६ पैकी ७२७ मतदान झाले ९७.४५ टक्के त्यानंतर व्यापारी मतदार संघात एकूण ७६३ पैकी ७०५ मतदान झाले ९२.३९ टक्के तसेच हमाल मापाडी २३४ पैकी २२६ मतदान झाले ९६.५८ तर ग्राम पंचायत मतदार संघात ९०९ पैकी ८७८ मतदान झाले.
या निवडणुकीत तिन पॅनल मध्ये झालेल्या निवडणुकीत मध्ये महाविकास तर्फे आमदार एकनाथराव खडसे व आमदार शिरीष चौधरी आणि माजी आमदार अरुण पाटील; भाजपातर्फे खासदार रक्षा खडसे तर महाविकास आघाडीतर्फे अनिल चौधरी यांची प्रतिष्ठा पणाला लागली होती. २ हजार ६५२ मतदारांपैकी दोन हजार ५३६ मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला आहे.
दरम्यान, आज सकळी शहरतील स्वामी विवेकानंद शाळेत सात टेबलांवर मतमोजणी सुरू झाली. यात पहिल्यापासून महाविकास आघाडी प्रणीत शेतकरी विकास पॅनलने घेतलेली आघाडी ही शेवटपर्यंत कायम राहिली. प्रारंभी हमाल-मापाडी मतदारसंघातून सैयद अजगर यांनी विजय संपादन केला. आर्थिक दुर्बल मतदारसंघातून पांडुरंग पाटील हे विजयी झाले. ओबीसी मतदारसंघातून संदीप पाटील यांनी बाजी मारली. एनटी राखीव मतदारसंघातून जयेश कुवटे यांनी विजय संपादन केला. अनुसूचित जमातीसाठी ( एसटी) राखीव असलेल्या विभागातून सिकंदर तडवी विजयी झाले. महिला राखीव मतदार संघातून मनीषा सोपान पाटील आणि शारदा हेमराज पाटील या उमेदवार विजयी झाल्या. आर्थिक दुर्बल घटक ग्रामपंचायत या वर्गवारीतून योगेश ब्रिजलाल पाटील आणि अपक्ष गणेश महाजन हे विजयी झालेत.
दरम्यान, सोसायटी मतदारसंघात मोठी चुरस पहायला मिळाली. यात मंदार मनोहर पाटील; राजेंद्र चौधरी; प्रल्हाद पाटील; डॉ राजेंद्र पाटील; योगिराज पाटील; पंकज पाटील आणि पितांबर पाटील हे विजयी झाले. अशा प्रकारे बाजार समितीच्या १८ जागांपैकी महाविकास आघाडीने १३ जागा मिळवत स्पष्ट बहुमत संपादन केले. महायुतीला तीन जागांवर समाधान मानावे लागले तर दोन ठिकाणी अपक्षांनी बाजी मारली. अशा प्रकारे येथे महायुतीचे वर्चस्व प्रस्थापित झाले आहे.