रावेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | तालुक्यातील निमड्या येथील खून प्रकरणी पोलिसांनी सहा संशयितांना ताब्यात घेतले आहे.
रावेर तालुक्यातील निमड्या येथे तरूणाचा खून झाल्याची घटना घडल्याने परिसर हादरला आहे. आदिवासी बहुल भाग असलेल्या निमड्या परिसरात काल सकाळी संजय पावरा या तरूणाचा मृतदेह आढळून आला होता. त्याला दगडाने ठेचून ठार मारल्याचे प्रथमदर्शनी दिसून आले होते. पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल करून तपासाची चक्रे फिरवली.
यात सदर तरूणाच्या मोबाईलवरून करण्यात आलेल्या कॉल्सचे विवरण पाहून पोलिसांनी सहा जणांना ताब्यात घेतले असून त्यांची कसून चौकशी सुरू करण्यात आलेली आहे. तर, दुसरीकडे तरूणाच्या खून झालेल्या ठिकाणाला अपर पोलीस अधिक्षक चंद्रकांत गवळी यांच्यासह उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. कुणाल सोनवणे, पोलीस निरिक्षक कैलास नागरे यांनी भेट दिली.