देवेंद्र फडणवीस देखील सहकार्‍यांसह अयोध्येत !

अयोध्या-वृत्तसेवा | उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि त्यांचे मंत्रीमंडळातील सहकारी हे देखील आज मुख्यमंत्र्यांच्या सोबतीने अयोध्येत दाखल होत आहेत.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा अयोध्या दौरा काल सायंकाळपासून सुरू झालेला आहे. ते आपल्या सहकार्‍यांसह रात्री लखनऊ येथे दाखल झाले. तेथे त्यांनी मुक्काम केला. यानंतर ते आज सकाळी अयोध्या येथे जात आहेत. दरम्यान, शिवसैनिकांची मुंबईतून निघालेली रेल्वे गाडी ही सकाळी अयोध्येत पोहचली असून खासदार श्रीकांत शिंदे यांनी त्यांचे स्वागत केले आहे.

दरम्यान, आज सकाळी अचानक उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या सहकार्‍यांसह अयोध्येला जाण्याचा निर्णय घेतला आहे. कालच मंत्री गिरीश महाजन यांच्यासह आमदार संजय कुटे, मंगेश चव्हाण आणि भाजप नेते मोहित कंबोज हे अयोध्येत दाखल झाले होते. या पाठोपाठ आज फडणवीस आणि त्यांच्या मंत्रीमंडळातील सहकारी हे देखील अयोध्या दौर्‍यावर जात असून ते मुख्यमंत्र्यांच्या महाआरती कार्यक्रमात सहभागी होणार आहेत.

Protected Content