जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । तालुक्यातील आव्हाणा शिवारातील शेत शिवारात महावितरण कंपनीच्या विद्यूत तारांच्या शॉटसर्कीटने लागलेल्या आगीत शेतातील कडबा आणि मकाचे कणीस जळून खाक झाल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी जळगाव तालुका पोलीस ठाण्यात गुरूवारी ६ एप्रिल रोजी सायंकाळी ६.३० वाजता आकस्मात आगीची नोंद करण्यात आली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, रामकृष्ण हरी पाटील (वय-५५) रा. आव्हाणा ता. जि.जळगाव यांचे जळगाव तालुक्यातील आव्हाणा शिवारात शेत आहे. शेतीकरून आपला उदरनिर्वाह करतात. ६ एप्रिल रोजी दुपारी १ वाजेच्या सुमारास त्यांच्या शेतातून गेलेल्या महावितरण कंपनीच्या विद्यतू तारांमुळे झालेल्या शॉर्टसर्कीटमुळे शेतात ठेवलेले मकाचे कणीस आणि कडबा चारा असा एकुण ८० हजारांचा मुद्देमाला जळून खाक झाला आहे. या घटनेबाबत जळगाव तालुका पोलीस ठाण्यात अकस्मात आगीची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास पोहेकॉ अनिल मोरे करीत आहे.