जिल्ह्यात आज ९९८ जणांनी घेतली कोवीशिल्डची लस

जळगाव प्रतिनिधी । जिल्ह्यातील २१ लसीकरण केंद्रावर कोवीशील्डची पहिली आणि दुसरी लस देण्यास सुरूवात करण्यात आली आहे. आज जिल्हाभरात एकुण ९९८ जणांना पहिली लस तर २७० जणांना दुसरी लस देण्यात आली आहे. आतापर्यंत जिल्ह्यात एकुण १७ हजार १५० जणांना कोवीशिल्डची पहिली लस देण्यात आल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.एन.एस.चव्हाण यांनी दिली आहे. 

गेल्या चार दिवसांपासून जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग वाढलेला दिसून आला आहे. नागरीकांनी आपल्यासह आपल्या कुटुंबियांची काळजी घेण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे. जिल्ह्यातील २१ कोवीड लसीकरण केंद्रावर लस उपलब्ध करून देण्यात आले आहे. आज दिवसभरात झालेले लसीकरण याप्रमाणे आहेत. जिल्हा रूग्णालय- १४०, गोल्ड सीटी हॉस्पिटल-१११, गाजरे हॉस्पिटल-७२, ऑर्किड हॉस्पिटल-३१, जैन हॉस्पिटल-०, जामनेर-४३, चोपडा-२५, मुक्ताईनगर-३३, चाळीसगाव-७०, पारोळा-१९, भुसावळ-४२, अमळनेर-३२, पाचोरा-७२, रावेर-६०, यावल-४४, भडगाव-११, बोदवड-४७, एरंडोल-२६, भुसावळ रेल्वे हॉस्पिटल-४३, धरणगाव-७७ असे एकुण ९९८ जणांना कोरोनाची पहिली लस देण्यात आली आहे. 

Protected Content