


पाळधी, ता. धरणगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | येथून जाणार्या दिंडीवर दगडफेक करण्यात आल्याने रात्री काही काळ तणाव निर्माण झाला.
याबाबत मिळालेली माहिती अशी की, जळगाव येथून निघालेली दिंडी ही पाळधी गावाच्या जवळून जात असतांना दिंडीवर काही समाजकंटकांनी दगडफेक केली. यात दिंडीतील काही भाविक जखमी झाले. दरम्यान, पाळधी गावात याची माहिती मिळताच दुसर्या बाजूने देखील दगडफेक करण्यात आली. यामुळे येथे एकच गोंधळाचे वातावरण निर्माण झाले.
दरम्यान, या प्रकाराची माहिती मिळताच पाळधी दूरक्षेत्रातून पोलीसांचा ताफा घटनास्थळी दाखल झाला. रात्री उशीरापर्यंत या संदर्भात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते. तर, या धुमश्चक्रीत काही वाहनांचे नुकसान झाल्याची माहिती देखील समोर आली आहे.



