Home Cities अमळनेर शिरसाळे गावात बंद घर फोडून रोकडसह दागिन्यांची चोरी

शिरसाळे गावात बंद घर फोडून रोकडसह दागिन्यांची चोरी


अमळनेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । तालुक्यातील शिरसाळे गावातील बंद घर फोडून घरातील रोकड आणि दागिने असा एकुण ६२ हजार रूपये किंमतीचा मुद्देमाल लंपास केल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी गुरूवार १६ मार्च रोजी दुपारी १ वाजता मारवड पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

अधिक माहिती अशी की, अमळनेर तालुक्यातील शिरसाळे गावात भटू शिवदास पाटील (वय-५०) हे आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. शेतीचे काम करून आपला उदरनिर्वाह करतात.  १५ मार्च रोजी सकाळी ११ ते दुपारी ३ वाजेच्या सुमारास त्यांचे घर बंद असतांना अज्ञात चोरट्याने बाहेर ठेवलेल्या चावीने दरवाजाचे कुलूप उघडून आत प्रवेश केला. घरातील गोदरेज कपाटातून सोन्याचे दागिने आणि रोकड असा एकुण ६२ हजार रूपये किंमतीचा मुद्देमाल चोरून नेला. हा प्रकार उघडकीला आल्यानंतर भटू पाटील यांनी मारवड पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली. त्यांनी दिलेल्या तक्रारीवरून गुरूवार १६ मार्च रेाजी दुपारी १ वाजता अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ भरत ईशी करीत आहे.


Protected Content

Play sound