अश्लील वर्तन करून महिलेचा विनयभंग

पहूर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जामनेर तालुक्यातील एका गावात राहणाऱ्या ४० वर्षीय महिलेशी अश्लील वर्तन करून विनयभंग केल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी पहूर पोलीस ठाण्यात एकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

पोलीसांकडून मिळालेली माहिती अशी की, जामनेर तालुक्यातील एका गावात ४० वर्षीय महिला ही आपल्या नातेवाईकांसह वास्तव्याला आहे. शेती करून त्या आपला उदरनिर्वाह करतात. गुरूवार १६ मार्च रोजी दुपारी ३ वाजेच्या सुमारास महिला ही आपल्या माम सासूकडे भेटण्यासाठी पायी जात असतांना गावात राहणारा विनोद देवचंद राठोड याने महिलेचा रस्ता आडविला. महिलेशी अश्लिल वर्तन करून तिचा विनयभंग केला. हा प्रकार घडल्यानंतर महिलेने पहूर पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली. त्यांनी दिलेल्या तक्रारीवरून संशयित आरोपी विनोद राठोड याच्या विरोधात पहूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक फौजदार प्रकाश पाटील करीत आहे.

Protected Content