पाचोरा (प्रतिनिधी) मुंबईहून निघालेल्या एका सुपरफास्ट रेल्वेत अचानक एका गरोदर महिलेस प्रसुती वेदना असह्य होवून ती कळवळत असल्याने सह्प्रवाश्यांनी थांबा नसतानाही पाचोरा स्थानकावर साखळी ओढून रेल्वे थांबवली. स्थानिक सेवाभावी तरुणांनी पुढाकार घेवून महिलेला पाचोरा ग्रामीण रूग्णालयात केले. तिथे तिची प्रसूती होवून तिने बाळाला जन्म दिला.
याबाबत अधिक माहिती अशी की, मुंबई येथून उत्तर प्रदेशातील आपल्या गावी निघालेल्या या महिलेस अचानक रेल्वेतच जोरदार प्रसुती वेदना सुरु झाल्या. सह प्रवाश्यांनी तिची अडचण जाणून मदतीचा प्रयत्न म्हणून थांबा नसतानाही पाचोरा स्थानकावर साखळी ओढून रेल्वे थांबवली. त्यानंतर रेल्वे स्थानक कर्मचार्यांच्या मदतीने तिला एस.एस. इंडियन ग्रुपच्या शरद पाटील बबलू सिनकर व सुमित सावंत यांनी घेतला पुढाकार घेवून मदत करीत येथील एका रुग्णालयात तिची प्रसुती करवली. सदर महिलेने एका बाळाला जन्म दिला असून मातेसह बाळही सुखरूप आहे. शहरातील तरुणांनी दाखवलेल्या माणुसकीमुळे त्यांचे कौतुक केले जात आहे.