Home क्रीडा क्रॉस कंट्री स्पर्धेत निखिल यमनेरे यांचे यश

क्रॉस कंट्री स्पर्धेत निखिल यमनेरे यांचे यश

0
32

मुक्ताईनगर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । मुक्ताईनगर तालुका एज्युकेशन सोसायटीचे श्रीमती जी.जी. खडसे महाविद्यालयाचा धावपटू निखिल यमनेरे याची क्रॉस कंट्री स्पर्धेसाठी कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव क्रॉस कंट्री संघात निवड झाली.

यापूर्वीही निखिलने अनेक स्पर्धांमध्ये यश मिळविले. अखिल भारतीय पातळीवरील या आंतर विद्यापीठ क्राँसकँट्री स्पर्धा १२ फेब्रुवारी २०२३ रोजी प्रेसिडेन्सी विद्यापीठ ,बंगलोर येथे संपन्न झाल्यात. या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी आपल्या विद्यापीठाचा संघ फेब्रुवारी २०२३ ला रवाना झाला होता. एकूण सहा खेळाडूंचा हा संघ या स्पर्धांमध्ये सहभागी होऊन नुकताच परतला. त्याबद्दल निखिल यमनेरेचा सत्कार महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य मा.डॉ .हेमंत महाजन यांनी केला. त्याला क्रीडा संचालिका प्रा. डॉ.प्रतिभा ढाके यांचे मार्गदर्शन मिळाले. निखिल यमनरे याने मिळविलेल्या या यशाबद्दल मुक्ताईनगर तालुका एज्युकेशन सोसायटीच्या मा. अध्यक्ष रोहिणी खडसे -खेवलकर, उपाध्यक्ष मा.नारायण दादा चौधरी, सचिव मा. डॉ. सी .एस. चौधरी, उपप्राचार्य मा. डॉ. अनिल पाटील व सर्व प्राध्यापक वृंद व शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्यात.


Protected Content

Play sound