पाच रूपये पाठविणे महिलेला पडले महागात

पाचोरा लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । पार्सल ऍक्टिव्हेट करण्याच्या नावाखाली दिलेल्या लिंकच्या माध्यमातून शहरातील एका महिलेची १ लाख ३० हजार ३१९ रुपयाची ऑनलाईन फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या संदर्भात बुधवार १ फेब्रुवारी रोजी दुपारी ३ वाजता पाचोरा पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्ती विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, पाचोरा शहरातील शांती नगरात सुवर्णा लक्ष्मण काळे (वय-४३) हे आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे नोकरी करून ते आपला उदरनिर्वाह करीत असतात. २८ जानेवारी रोजी सकाळी ११ ते ३१ जानेवारी दुपारी १२ वाजेच्या दरम्यान त्यांना एका अनोळखी नंबर वरून मेसेज आला फोन आला. त्यात सांगितले की, तुमचे पार्सल डिॲक्टीवेतटी ऍक्टिव्ह झाले आहे. ते ॲक्टिव्ह करण्यासाठी तुम्हाला दिलेली लिंकवर ५ रुपये पाठवा. त्यानुसार महिलेने लिंकवर जाऊन ५ रुपये पाठवले. त्यानंतर काही वेळातच त्यांच्या खात्यातून १ लाख ३० हजार ३१९ रुपये परस्पर कमी झाले. हा प्रकार त्यांच्या लक्षात आल्यानंतर आपली फसवणूक झाल्याचे समजले. त्यानुसार त्यांनी अखेर बुधवार १ फेब्रुवारी रोजी दुपारी ३ वाजता पाचोरा पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिली आहे. त्यांनी दिलेल्या तक्रारीवरून अनोळखीनंबर धारकावर पाचोरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास सहाय्यक फौजदार प्रकाश पाटील करीत आहे.

Protected Content