दारूचे पैसे मागितल्याने डोक्यात फोडली बिअरची बाटली

जळगाव – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । शहरातील रेस्टॉरंट बार पैसे मागण्याच्या कारणावरून व्यवस्थापकाला शिवीगाळ करून डोक्यात बिअरची बाटली मारून गंभीर दुखापत केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी जिल्हापेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

जिल्हापेठ पोलीसांकडून मिळालेली माहिती अशी की, शहरातील प्रताप नगरातील वुडलँड रेस्टॉरंट येथे व्यवस्थापक म्हणून विठ्ठल सुपडू कोळी (वय-३२) रा. अयोध्या नगर जळगाव हे काम पाहतात. गुरूवार ५ मे रोजी रात्री १०.३० वाजेच्या सुमारास दारूचे पार्सल घेण्यासाठी पंकज अंबादास सोनवणे हा तिथे आला. त्याने विठ्ठल कोळी यांना दारूचे पार्सल मागितले. पार्सल दिल्यावर पार्सलचे एकुण ६९० रूपये मागितले. याचा राग आल्याने पंकज सोनवणे यांने शिवीगाळ करून रेस्टॉरंट बाहेर निघून गेला. बाहेर दुचाकीची तोडफोड केली. आवरण्यासाठी विठ्ठल कोळी गेले असता त्यांच्या डोक्यात बिअरची बाटली डोक्यावर मारली. यात विठ्ठल कोळी हे जखमी होवून बेशुध्द झाले. त्यांना तातडीने जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले.

याप्रकरणी विठ्ठल कोळी यांच्या फिर्यादीवरून संशयित आरोपी पंकज सोनवणे रा. कांचन नगर जळगाव याच्या विरोधात जिल्हा पेठ पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ फिरोज तडवी करीत आहे.

 

आम्हाला विविध सोशल मंचावर फॉलो करा

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

error: Content is protected !!