अल्पवयीन मुलीला फूस लावून पळविले

धरणगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । धरणगाव शहरातील एका भागात राहणाऱ्या १७ वर्षीय अल्पवयीन मुलीला एकाने फूस लावून पळवून नेल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी धरणगाव पोलीस ठाण्यात बुधवारी १ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ७ वाजता एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, धरणगाव शहरातील एका भागात १७ वर्षीय अल्पवयीन मुलगी ही आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. मंगळवारी ३१ जानेवारी रोजी दुपारी १२ वाजता अल्पवयीन मुलगी ही घरी असताना गावात राहणारा अक्षय कैलास मराठे याने मुलीला काहीतरी सांगून फूस लावून पळवून नेले.ही घटना घडल्यानंतर पीडित मुलीच्या नातेवाईकांनी तिचा सर्वत्र शोध घेतला, परंतु ती कुठेही मिळून आली नाही, अखेर त्यांनी बुधवारी १ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ७ वाजता धरणगाव पोलीस ठाण्यात धाव घेतली. अक्षय कैलास मराठे यानेच अल्पवयीन मुलीला पळवून नेली असल्याचा संशय व्यक्त करत पोलीसात तक्रार दिली आहे. याप्रकरणी धरणगाव पोलीस ठाण्यात संशयित आरोपी अक्षय कैलास मराठे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक जीभाऊ पाटील करीत आहे.

Protected Content