चाळीसगाव- लाईव्ह ट्रेंड्स न्युज प्रतिनिधी | गेल्या काही दिवसांपासून गाजत असलेल्या पदवीधर व शिक्षक मतदार संघाच्या निवडणुकीसाठी आज मतदान प्रक्रिया राष्ट्रीय विद्यालयात राबविण्यात आली. यावेळी एकूण ३ हजार सातशे ७४ मतदारांपैकी ६० टक्के मतदान झाले.
पदवीधर व शिक्षक संघाच्या पाच जागांसाठी आज सोमवार ३० रोजी सकाळी ८ वाजेपासून ते दुपारी ४ वाजेपर्यंत शहरातील राष्ट्रीय महाविद्यालयात मतदान प्रक्रिया राबविण्यात आली. एकूण ३ हजार सातशे ७४ मतदारांपैकी २ हजार दोनशे ६५ मतदारांनी मतदान केले. त्यामुळे यावेळी एकूण मतदारांपैकी ६० टक्के इतके मतदान झाले आहे. यासाठी मेहूणबारे याठिकाणी एक तर राष्ट्रीय विद्यालयात तीन असे एकूण चार केंद्र होते. दरम्यान
दुपारपर्यंत संथगतीने सुरू असलेले मतदान २ वाजेनंतर मतदात्यांनी आपले हक्क बजाविण्यासाठी एकच गर्दी केली. आणि मतदान केले. तत्पूर्वी यावेळी कार्यकर्त्यांमध्ये मोठ्या प्रमाणात उत्साह दिसून आला. यावेळी काही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता. मात्र २ फेब्रुवारी रोजीला लागणाऱ्या निकालाकडे आता संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.