जळगाव महापालिकेच्या आयुक्तपदी डॉ. माधवी खोडे-चवरे यांची नियुक्ती

MadhaviKhodeChaware 1

जळगाव प्रतिनिधी । जळगाव महानगरपालिकेच्या आयुक्तपदी डॉ. माधवी खोडे चवरे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. मावळते आयुक्त उदय टेकाळे यांची सेवानिवृत्ती झाल्याने आयुक्तपद रिक्त होते. प्रभारी म्हणून जिल्हाधिकारी डॉ.ढाकणे हे कामकाज पाहत होते.

नागपूर येथे वस्त्रोद्योग विभागात संचालकपदी डॉ. माधवी खोडे-चवरे ह्या सध्या काम पाहत आहे. डॉ. माधवी खोडे-चवरे ह्या २००७ बॅचच्या आयएएस अधिकारी आहेत. यापुर्वी त्यांनी भंडारा आणि चंद्रपूर येथे मुख्य कार्यकारी अधिकारी, तर भंडारा जिल्ह्याचे जिल्हाधिकारीपद यशस्विरित्या संभाळले आहे. तसेच राज्याच्या मनरेगाचे पहिल्या आयुक्त म्हणूनही त्यांनी काम पाहिले आहे. मावळते आयुक्त उदय टेकाळे यांची सेवानिवृत्ती झाल्याने आयुक्तपद रिक्त झाल्याने राज्य शासनाने त्यांची जळगाव महानगरपालिका आयुक्तपदी नियुक्ती केली आहे. एवढी अनुभवी व्यक्ती त्याच्या रूपाने जळगाव मनपाला मिळते आहे. त्यामुळे जळगाव शहराचा काय कायपालट करतात व प्रशासनाला कशी शिस्त लावतात याकडे सामान्य जळगावकरांचे लक्ष लागून आहे.

डॉ. माधवी खोडे-चवरे यांचा गौरव
२०१६ मध्ये डी.डी.सह्‌याद्रीतर्फे ‘हिरकणी’ पुरस्काराने, तर मुलांच्या हितासाठी उत्कृष्ठ कार्य केल्याबद्दल त्यांना इंडीयन एक्सप्रेस गृपच्या माध्यमातून त्यांना ‘एक्सलन्स इन गव्हरर्नन्स अवार्ड-२०१९’ या दोन विशेष पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.

Protected Content