पारोळा नगरपालिकेकडून कर्मचाऱ्यांना मास्क व हॅन्ड ग्लोज वाटप

पारोळा, प्रतिनिधी । कोरोना व्हायरस १९ या संसर्ग जन्य विषाणूपासून प्रतिबंधात्मक उपाय म्हणून पारोळा नगर परिषदेच्या वतीने येथील सफाई कर्मचाऱ्यांनी तोंडाला लावण्यासाठी मास्क, हॅन्ड ग्लोज व डेटाल साबणाचे वाटप करण्यात आले.

कोरोना व्हायरसपासून बचावासाठी प्रतिबंधात्मक उपाय म्हणून नगर परिषदेतर्फे सफाई कर्मचाऱ्यांना मास्क, हॅन्ड ग्लोज व डेटॉल साबणाचे वाटप करण्यात आले. यावेळी मुख्य अधिकारी यांनी शासनाने दिलेल्या खबरदारीबाबतच्या सुचनानचे काटेकोरपण अमलबजावणी करण्याच्या बाबतीत मार्गदर्शन केले. व या कोरोना व्हायरसबाबत जनजागृती करण्याचे ही सांगितले. यावेळी नगराध्यक्ष करण पाटील, आरोग्य सभापती दिपक अनुष्ठान ,व्ही. एम. इंसूलकर, रविद्र पाटील, चंद्रकांत महाजन, संदीप पाटील, व इतर कर्मचारी उपस्थित होते.

Protected Content