Home Cities एरंडोल महामार्गावरील अपघातात दुचाकीस्वार तरूण जखमी

महामार्गावरील अपघातात दुचाकीस्वार तरूण जखमी

0
50

एरंडोल-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । एरंडोल शहरानजीकच्या राष्ट्रीय महामार्गावर अज्ञात ट्रकच्या धडकेत ३० वर्षीय तरूण जखमी झाल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी शनिवारी ७ जानेवारी रोजी दुपारी ३ वाजता अज्ञात ट्रकचालकावर एरंडोल पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलीसांनी दिलेली माहिती अशी की, अक्षय सतिष जैन (वय-३०) रा. योगेश्वर नगर, जळगाव हा तरूणी कामाच्या निमित्ताने एरंडोल येथे शनिवारी ७ जानेवारी रोजी सायंकाळी गेला होता. काम आटोपून रात्री १ वाजेच्या सुमारास एरंडोल येथून जळगावला येण्यासाठी दुकाचीने निघाला होता. त्यावेळी एरंडोल शहराच्या नजीकच्या राष्ट्रीय मार्गावरील टेलीफोन एक्सचेंज जवळून जात असतांना समोरून येणाऱ्या अज्ञात ट्रकने जोरदार धडक दिली. या अपघाता दुचाकीवरील अक्षय जैन हे गंभीर जखमी झाले. त्यांना एरंडोल ग्रामीण रूग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे. याप्रकरणी शनिवारी ७ जानेवारी रोजी दुपारी ३ वाजता अज्ञात ट्रक चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ संतोष चौधरी करीत आहे.


Protected Content

Play sound