Home Cities अमळनेर तरूणाने शेतात संपविली जीवनयात्रा

तरूणाने शेतात संपविली जीवनयात्रा

0
53


अमळनेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । अमळनेर तालुक्यातील मांजर्डी येथील ३० वर्षीय युवकाने शेतातील झाडाला गळफास घेवून आत्महत्या केल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी शनिवारी ७ जानेवारी रोजी दुपारी १ वाजेच्या सुमारास अमळनेर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

सुकदेव शिवाजी भिल (वय-३०) रा. मांजर्डी ता. अमळनेर असे मृत तरूणाचे नाव आहे. आत्महत्या करण्याचे नेमके कारण समजू शकले नाही.

अधिक माहिती अशी की, सुकदेव भील हा आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. शेती करून आपल्या परिवाराचा उदरनिर्वाह करत होता. सुकदेव याने शनिवारी ७ जानेवारी रोजी भटू आत्माराम पाटील यांच्या शेतातील निंबाच्या झाडाला गळफास घेवूवन आत्महत्या केली. भटू पाटील हे दुपारी १ वाजता शेतात पाणी भरण्यासाठी गेले तेव्हा त्यांना सुकदेव भील याने आत्महत्या केल्याचे निदर्शनास आले. त्यांनी गावातील व शेतातील नागरीकांना बोलावून घेतले. खाली उतरवून तातडीने अमळनेर ग्रामीण रूग्णालयात दाखल केले असता वैद्यकीय अधिकारी यांनी मयत घोषीत केले. आत्महत्या करण्याचे कारण समजू शकले नाही. याप्रकरणी शनिवारी ७ जानेवारी रोजी दुपारी ३ वाजता अमळनेर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. या घटनेचा पुढील तपास पोहेकॉ संदेश पाटील करीत आहे.


Protected Content

Play sound