शालेयस्तरीय गीता पठण स्पर्धेत विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग

अण्णासाहेब जी. डी. बेंडाळे प्रतिष्ठानतर्फे शालेय स्तरावरील विद्यार्थ्यांसाठी गीता पठण स्पर्धेचे आयोजन

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । शहरातील अण्णासाहेब जी. डी. बेंडाळे प्रतिष्ठानतर्फे गेल्या सतरा वर्षापासून शालेय स्तरावरील विद्यार्थ्यांसाठी गीता पठण स्पर्धेचे आयोजन केले जात आहे यात जिल्ह्याभरातील विविध शाळांचे विद्यार्थी यात उत्फुर्तपणे  सहभागी होतात. यंदा गीता पठण स्पर्धेत २६ शाळांमधील १ हजार ८२३ विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता.

सदर स्पर्धा चार गटात झाली. यात शहरी व ग्रामीण असे दोन भाग होते. दैनिक सकाळचे ज्येष्ठ पत्रकार सचिन जोशी यांनी आपल्या भाषणात सांगितले कि, 5 हजार वर्षापासून गीता अभ्यासली जात आहे. संस्कृत श्लोक पाठांतर केल्यामुळे उच्चार व वाणी शुद्ध होते आणि पाठांतराची सवय असेल तर कठीण विषय देखील सोपे होतात. त्यामुळेच अण्णासाहेब जी. डी. बेंडाळे यांनी दुर्दुर्ष्टी ठेवून गीता पठाण स्पर्धा सुरु केली, असे विचार मांडले. ते बक्षीस वितरण कार्यक्रमात बोलत होते.

विशेष म्हणजे यंदा सांघिक गटात देखील विद्यार्थ्यांनी हिरीरीने सहभाग घेतला असे विचार के.सी.ई.चे प्रशासकीय अधिकारी शशिकांत वडोदकर यांनी व्यक्त केले पुढे बोलताना, ते म्हणाले की भगवद्गगीता हा केवळ धर्मग्रंथ नसून हा  संसार रुपी रथाला चालवणारा ग्रंथ आहे. प्रत्येक मानवाने आपल्या धर्मग्रंथाचे वाचन केल्यास त्याच्या जीवनाला दिशा मिळते. त्याच्या समस्येचे उत्तर नक्कीच मिळते.

यावेळी मंचावर दैनिक सकाळचे सचिन जोशी,शिक्षण शास्त्र व शारीरिक शिक्षण शास्त्र महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. ए.आर. राणे , चंद्रकांत भंडारी, शशिकांत वडोदकर उपस्थित होते. या स्पर्धेचे परीक्षण 30 परीक्षकांनी केला.यावेळी गीता पठाण स्पर्धेत सहभागी असलेल्या दामिनी गांवडे विद्यार्थीनीने आपले मनोगत व्यक्त केले.

हर्षा पाठक या शिक्षक प्रतिनिधीत्व ,पालक रेखा मोर्य व राणी भालेराव यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमचे सुत्रसंचालन मुख्याध्यापक प्रणिता झांबरे यांनी मानले. तर आभार चंद्रकांत भंडारी यांनी केले. कार्यक्रमच्या यशस्वीतेसाठी महेंद्र नेमाडे, बिपीन झोपे, पराग राणे, एकनाथ पाचपांडे, धीरज चौधरी, नरेंद्र पालवे, रेखा पाटील, योगेश भालेराव, प्रा.निलेश जोशी, मोहन चौधरी, दिपक दलाल, ए.टी.झांबरे विद्यालय, प.वि.पाटील शाळाचे शिक्षक ,शिक्षेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.

गीता पठण स्पर्धा २०२३ निकाल –
हर्ष जगदिश कुमावत, शाश्वत विशाल कुलकर्णी, निधी हितेंद्र भंगाळे, नव्या संदिप महाजन, लोक्षदा रुपेश महाजन, तेजस्विनी गजानन महाजन, विशाखा योगेश पाटील, विशाखा प्रविण भोळे, लिना गणेश माळी, लावण्या सतिश शिपी, सोहम गिरीश वानखेडे, रसिका प्रविण वायकोळे, भुमिका तुषार कापडणीस, धनश्री संदिप पाटील ,भक्ती रविद्र कोळी ,प्रतिक राजेंद्र राठोड, सानवी चंद्रकांत वाणी, चेतन विशाल पाटील , कोमल प्रदिप नारखेडे ,देवांश मुरलीधर चौधरी, मनस्वी रविद्र पाटील,कृपा कैलास पाटील,तनिष्का सुरेंद्र सोनार , भुमी संतोष सपके ,मयुरी नागेश तावडे, तन्वी मनिष मोरे,राधिका देवेद्र पाटील, विधी किरण नेहेते ,चौधरी दामोदर धनंजय,जयेश गोपाळ जगताप , खुश राजेंद्र पवार , मिताली रामदास भारुडे
हर्षदा गोरख सपकाळे, सुदृत सुनिल पवार ,सिदधेश प्रितम भावसार ,यशश्री धनजय गौतम ,जाधव वैष्णवी वासुर्देव ,तनुजा संदिप शिंदे ,रूद्र सतीश पाटील, नकुल सुनिल पाटील,सोहम गीरीष वानखेडे,आदिती किशोर कोल्हे,मयुर रामदास नन्नवरे

सहभागी शाळेचे नाव-
ए. टी. झांबरे माध्यमिक विद्यालय, जळगाव, ओरियॉन इंग्लिश मिडीअम स्टेट बोर्ड स्कुल, जळगाव, गुरुवर्य प. वि. पाटील प्राथमिक विद्यामंदिर जळगाव ओरिऑन इंग्लिश मेडियम सी.बी.एस.सी. स्कूल, जळगाव, काशीबाई उखाजी कोल्हे विद्यालय, जळगाव, या. दे. पाटील माध्यमिक विद्यालय मेहरूण, जळगाव, प न लुंकड कन्या शाळा जळगाव,
माध्यमिक विद्यालय, शारदा कॉलनी, जळगाव, नंदिनीबाई वामनराव मुलींचे विद्यालय, श्रीमती जे ए बाहेती हायस्कुल जळगाव, त्र्यंबकनगर प्राथमिक विद्यामंदिर,  नानासाहेब आर बी पाटील माध्यमिक विद्यालय ,सौ के जी मणियार प्राथमिक विद्यालय मेहरुण, उज्वल स्प्राऊटर  इंटरनॅशनल स्कुल)विद्या विकास मंदिर प्राथमिक शाळा , विद्या विकास माध्यमिक विद्यालय ,शा. ल. खडके प्राथमिक विदया मंदिर,  ज. सु. खडके प्राथमिक विद्यामंदिर, विवेकानंद प्रतिष्ठान प्राथमिक शाळा वाघनगर हरणाताई जोशी प्राथमिक विद्यालय चाळीसगाव,प्रताप विद्या मंदीर चोपडा, पी. आर. हायस्कुल धरणगांव,सार्वजनिक विद्यालय, आसोदा,ब गो शानभाग विद्यालय सावखेडा,पोदार स्कुल जळगाव,काशिबाई दामू भोळे प्राथमिक विद्यामंदिर, आसोदा.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

Protected Content