महाशिवरात्रीनिमित्त शिवपुराण व अखंड हरीनाम किर्तन सप्ताहाचे आयोजन

पहूर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । पहूर येथील श्री क्षेत्र केवडेश्वर महादेव मंदिर येथे महाशिवरात्रीनिमित्त शिवपुराण व अखंड हरिनाम कीर्तन सप्ताहाचे आजपासून आयोजन करण्यात आले आहे.

कै. बाळकृष्ण कुलकर्णी शास्त्री महाराज पहूर पेठ (श्री चैतन्य कानिफनाथ सेवा आश्रम नेवासा) यांच्या प्रेरणेने सालाबादप्रमाणे महाशिवरात्रीनिमित्त श्रीक्षेत्र केवडेश्वर महादेव मंदिर येथे शिवपुराण व अखंड हरिनाम संकीर्तन सप्ताहास आजपासून प्रारंभ होत असून शिवपुराण कथा प्रवक्ते भागवताचार्य ह.भ.प श्री महादेव महाराज खंडागळे निपाणा यांच्या मधुर वाणीतून शिवपुराण कथा दररोज दुपारी एक ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत राहणार आहे.

यात १ शुक्रवार रोजी हभप अविनाश महाराज, आळंदी, २ शनिवार रोजी हभप नरेंद्र महाराज, कोल्हे, ३ रविवार रोजी हभप कृष्णा महाराज, वाकोद, ४ सोमवार रोजी हभप लखन महाराज, चिंचखेडा, ५ मंगळवार रोजी हभप भगवान महाराज, बुलढाणा, ६ बुधवार रोजी हभप योगेश महाराज, दोंडाईचा, ७ गुरुवार रोजी हभप महादेव महाराज, निपाणेकर, ८ शुक्रवार रोजी हभप अशोक महाराज, वनकुंठे एरंडोल, ९ रोजी हभप नारायण महाराज उधळीकर यांचे काल्याचे किर्तन होणार आहे.

८ मार्च २०२४ शुक्रवार रोजी महाशिवरात्रीनिमित्त श्री स्वामी समर्थ सेवा केंद्र पहुर रुद्राभिषेक सकाळी ७ ते १२ अभिषेक, दुपारी १ ते ५ दिंडी सोहळा व सायंकाळी ७ ते ९ दीपोत्सव असा या सप्ताहात कार्यक्रम राहणार असून पंचक्रोशीतील भाविक भक्तांनी या कीर्तन सप्ताह व शिव महापुराण कथेचा लाभ घ्यावा असे आवाहन श्री केवडेश्वर महादेव मंदिर ट्रस्टच्या वतीने करण्यात आले आहे.

Protected Content