खेडी येथे शनिवारी श्री महादेव प्राणप्रतिष्ठा सोहळा

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । खेडी गावातील हुडको कॉलनी परिसरात श्री महादेव प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. या सोहळ्यानिमित्त 1 ते 3 मार्च रोजी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

येथील रहिवाशी आणि धानशूर व्यक्तींच्या सहकार्यातून याठिकाणी श्री महादेव मंदिराचा जीर्णेाध्दार करण्यात आला आहे. श्री महादेव प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त शुक्रवार, 1 मार्च रोजी सायंकाळी 5 ते 7 यावेळेत देवआगमन आणि धान्यवास कार्यक्रम होणार आहे. 2 मार्च रोजी सकाळी 9 वाजता जलाधीवास पूजन मांडणी होईल. त्यानंतर दुपारी 2 वाजता स्थापना व 3 वाजता फुलाधिवास, 4 वाजता फलादीवास आणि 5 वा. मूर्ती अभिषेक करुन शंखादिवास करण्यात येणार आहे.

3 मार्च रोजी सकाळी 7 ते 11.11 वा. मंदिरापासून गावात महिलांची कलशयात्रा काढण्यात येणार आहे. त्यानंतर मंदिरात प्राणप्रतिष्ठा सोहळा पार पडले. या श्री महादेव प्राणप्रतिष्ठा सोहळ्यास सर्व ग्रामस्थांनी उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

Protected Content