Home Uncategorized गिरीशभाऊंच्या पठ्ठयाची कमाल : अरविंद देशमुखांचा दणदणीत विजय

गिरीशभाऊंच्या पठ्ठयाची कमाल : अरविंद देशमुखांचा दणदणीत विजय

0
109

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | जिल्हा दुध संघाच्या निवडणुकीत ना. गिरीश महाजन यांचे कट्टर समर्थक अरविंद देशमुख यांनी दणदणीत विजय संपादन करून दुध संघात प्रवेश केला आहे.

सविस्तर वृत्त खालील लिंकवर क्लिक करून वाचा

मूळचे पहूर येथील रहिवासी असणारे अरविंद भगवान देशमुख यांनी दुध संघाच्या निवडणुकीत भटक्या विमुक्त जमाती या प्रवर्गातून शेतकरी विकास पॅनलमधून उमेदवारी अर्ज भरला होता. त्यांच्या समोर विजय रामदास पाटील हे सहकार पॅनलमधून उभे होते. अरविंद देशमुख यांनी आधी दुध संघावर प्रशासक म्हणून काम केले होते. आ. मंगेश चव्हाण यांच्या साथीने त्यांनी संचालक मंडळाचा गैरव्यवहार चव्हाट्यावर मांडण्यात मोलाची भूमिका पार पाडली होती. यानंतर त्यांना उमेदवारी देखील मिळाल्याने त्यांच्या जागेकडे सर्वांचे लक्ष लागले होते.

दरम्यान, रविवारी सकाळी मतमोजणी सुरू झाली. यात भटक्या-विमुक्त जमाती वर्गवारीचा निकाल लागला. यात अरविंद देशमुख यांनी तब्बल 90 इतक्या मताधिक्याने विजय संपादन केला आहे.

अरविंद देशमुख हे ग्रामविकास मंत्री ना. गिरीश महाजन यांचे कट्टर समर्थक असून ते त्यांच्या मीडियाचे काम प्रभावीपणे सांभाळत आहेत. आरोग्य सेवक म्हणून त्यांनी केलेली कामगिरी लक्षणीय असून आता सहकाराच्या क्षेत्रात त्यांची दमदार एंट्री झाली आहे.


Protected Content

Play sound