Home Uncategorized आ. संजय सावकारे यांना वाढदिवसाचे गिफ्ट : पुन्हा ठरले ‘मुकद्दर का सिकंदर’...

आ. संजय सावकारे यांना वाढदिवसाचे गिफ्ट : पुन्हा ठरले ‘मुकद्दर का सिकंदर’ !

0
117

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | भुसावळचे आमदार संजय सावकारे यांनी शेतकरी विकास पॅनलकडून सहजगत्या विजय संपादन करत दुध संघात प्रवेश केला आहे.

भुसावळचे आमदार संजय सावकारे यांनी शेतकरी विकास पॅनलकडून अनुसुचीत जाती या प्रवर्गातून उमेदवारी अर्ज दाखल केला होता. त्यांच्या विरूध्द ब्रह्मे यांनी उमेदवारी केली होती. या लढतीत सावकारे यांचे पारडे जड मानले जात होता. निकालातून तसे अधोरेखीत झाले. सावकारेंनी अगदी सहजगत्या विजय संपादन केला. ते आधीच जिल्हा बँकेत संचालक असून आता जिल्हा दुध संघात देखील त्यांची एंट्री झाली आहे. लक्षणीय बाब म्हणजे आज अर्थात ११ डिसेंबर रोजी त्यांचा वाढदिवस आहे. याच दिवशी त्यांना दुध संघातील विजयाच्या स्वरूपात मोठे गिफ्ट मिळाले आहे.

आज सकाळी झालेल्या मतमोजणीत आमदार संजय सावकारे यांना 264 इतकी मते मिळाली. यामुळे आमदार सावकारे हेविजयी झाले.


Protected Content

Play sound