जळगावात विविध आजाराच्या दुखण्यावर तीन दिवसीय शिबीराचे आयोजन

जळगाव-लाईव्‍ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । श्री श्याम दर्द निवारण केंद्राच्या वतीने शहरात तीन दिवसीय शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे. यात विविध प्रकारच्या दुखण्यावर उपचार व मार्गदर्शन केले जाणार आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, जळगाव शहरातील गोलाणी मार्केट जवळील किरण चहाच्या पाठीमागे असलेल्या श्री श्याम सेवा केंद्राच्या वतीने २५ ते २७ नोव्हेंबर दरम्यान, सकाळी ९ ते दुपारी १ वाजेच्या दरम्यान शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबीरात तज्ञ डॉ. दयाल तोषणीवाल हे उपचार करणार आहे. यात पाठ, सायटीका, गुडघे, स्पॉन्डिलाइटिस, फ्रोजन शेल्डर, मानेचे त्रास, वात रोग, ॲसिडीटी, मायग्रेनसह तणाव मुक्तीसाठी विविध मार्गदर्शन केले जाणार आहे. दरम्यान, आयोजित केलेल्या शिबीरात ५० टक्के सवलतीच्या दरात तपासणी व उपचार केले जाणार आहे. तरी या शिबीराचा गरजू रूग्णांनी लाभ घ्यावा असे आवाहन ॲक्यूपंचरिष्ट डॉ. दयाल आर, तोषणीवाल यांनी प्रसिध्दीपत्रकान्वये कळविले आहे.

Protected Content