महापरीक्षा पोर्टल त्वरित रद्द करा ; छावा मराठा युवा महासंघाची मागणी

WhatsApp Image 2019 12 04 at 12.52.07 PM 1

जळगाव, प्रतिनिधी | महाराष्ट्र शासनातर्फे राबविण्यात येत असलेल्या मेगाभरती अंतर्गत परीक्षा घेण्यासाठी महापरिक्षा पोर्टल हे वापरण्यात येत आहे. परंतु सदर पोर्टलमध्ये दिवसेंदिवस घोळ आढळून येत असून महापरीक्षा पोर्टल त्वरित रद्द करण्यात यावे अशी मागणी छावा मराठा युवा महासंघातर्फे निवासी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदनाद्वारे करण्यात आली.

महापरीक्षा पोर्टलची परीक्षा घेण्याची व गुणदान करण्याची पध्दत ही सामान्य विद्यार्थ्यांना संभ्रमात टाकणारी आहे. त्यानंतर लावण्यात येणाऱ्या गुणवत्ता निवड यादीतही दिवसेंदिवस घोळ उघड होत आहे. त्या अनुषंगाने सदर पोर्टल त्वरित रद्द करून पूर्वी भरती प्रक्रिया ही राबविण्यात यावी तसेच विद्यार्थ्यांना उत्तरपत्रिकेची ओएमआर शीट देण्यात यावी ही मागणी छावा मराठा युवा महासंघाच्या वतीने करण्यात आली. यावेळी छावा मराठा युवा महासंघाचे जळगांव जिल्हाध्यक्ष अमोल कोल्हे, जिल्हा कार्याध्यक्ष महेंद्र बापू कोळी , जिल्हा सरचिटणीस ऋषिकेश जाधव, महानगराध्यक्ष प्रशांत फाळके, एरंडोल तालुकाध्यक्ष महेश पाटील, प्रा. डॉ. आशिष जाधव, धनंजय चौधरी, कुणाल कोळी, विलास कोळी, चेतन चौधरी, दीपक बाविस्कर व आदी विविध संघटनांचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Protected Content