एकनाथ शिंदे गटाने रिक्षासह सादर केली तीन चिन्हे !

मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | उध्दव ठाकरे यांना मशाल चिन्ह मिळाल्यानंतर एकनाथ शिंदे यांनी रिक्षासह तीन चिन्हे मिळावीत यासाठी केंद्रीय निवडणूक आयोगाला पत्र पाठविले आहे.

मागील काही दिवसांपासून उद्धव ठाकरे गट आणि शिंदे गटात निवडणूक चिन्ह आणि पक्षाच्या नावावरून रस्सीखेच सुरू होती. काल रात्री अखेर निवडणूक आयोगानं ‘बाळासाहेबांची शिवसेना’ हे नाव शिंदे गटाला दिलं आहे. तर उद्धव ठाकरे यांच्या गटाला ‘शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे’ हे नाव दिलं आहे. यासोबत ‘धगधगती मशाल’ हे चिन्ह उद्धव ठाकरे गटाला दिलं आहे. पण शिंदे गटाचे तिन्ही चिन्हं निवडणूक आयोगानं अमान्य केली आहेत. पुन्हा नव्याने तीन चिन्हे सूचवा, असा आदेश निवडणूक आयोगानं दिला होता.

या अनुषंगाने एकनाथ शिंदे यांच्या गटातर्फे रिक्षा, तुतारी आणि शंख अशी तीन चिन्हांची यादी केंद्रीय निवडणूक आयोगाला सादर केली आहेत. याबाबतची माहिती ई-मेलच्या माध्यमातून आयोगाला कळविण्यात आले आहे. यावर दुपारपर्यंत निर्णय होण्याची शक्यता आहे.

Protected Content